संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने जुळ्यांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पालघर – देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही काही ग्रामीण भागात अजून चांगले रस्ते नाहीत . त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही . पालघर मध्ये अशाच एका दुर्दैवी घटनेत रुग्णालयात जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने दोन जुळ्या मुलांचा त्यांच्या आईसमोरच मृत्यू झाला.भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करून हि माहिती दिली .

पालघर जिल्हा हा आदीवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील बोटोशी गावातील मर्कटवाडीयेथे   राहणाऱ्या वंदना भुदर या  महिलेची सातव्या महिन्यात प्रसूती झाली आणि तिला जुळी मुले झाली . हि मुले अशक्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करायचे होते. पण गावात आरोग्य केंद्र नव्हते. आणि शहरातील रुग्णालयात जाण्यासाठी चांगला रस्ताही नव्हता. अखेर वंदनाच्या  नातेवाईकांनी  तिला आणि तिच्या जुळ्या मुलांना झोळीच्या साहाय्याने खडकाळ भागातून ३ किमी. पायपीट करून  रुग्णालयात न्यावे लागले. मात्र रुग्णालयात पोचायला उशीर झाला.  त्यामुळे त्या जुळ्या मुलांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.   परिणामी आई समोरच जुळ्या बालकांचा  मृत्यू झाला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्वतः ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन  पालघर जिल्हा बनवण्यात आला. पण अनेक वर्ष होऊनही या आदिवासी जिल्ह्यात अजूनही प्रार्थमिक सेवा सुविधा नसल्याने इथल्या ग्रामीण जनतेचे असे हाल होत आहेत .
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami