संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

रुपया घसरला नाहीतर डॉलर मजबूत होतोयं !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय रुपयाची घसरण होत नसून अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याचे वक्तव्य केले आहे.वॉशिंग्टन डीसीमध्ये एका पत्रकार परिषदेत त्या संबोधित करत होत्या. या परिषदेत एका पत्रकाराने त्यांना भारतीय रुपयाबाबत प्रश्न विचारला होता.

दरम्यान रुपयाचे लक्षणीय अवमूल्यन झाले आहे. आगामी काळात रुपयासाठी तुम्हाला कोणती आव्हाने दिसत आहेत आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे जाल, असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता.यावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मला रुपयाची घसरण होताना दिसत नाही, पण अमेरिकन डॉलर मजबूत होताना दिसत आहे. डॉलर मजबूत होत आहे. त्यामुळे साहजिकच ते चलन मजबूत होत असलेल्या तुलनेत रुपया कमकुवत होतील. इतर उदयोन्मुख बाजार चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया चांगली कामगिरी करत आहे.मात्र,रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान,अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सातत्याने घसरण होत आहे.एका डॉलरचे मूल्य ८२.४२ भारतीय रुपया इतके झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami