बंगळुरू: अनुभवी हॉकीपटू आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार रुपिंदर पाल सिंग दुखापतीमुळे जकार्ता येथे 23 मेपासून सुरू होणार्या आशिया हॉकी चषकमधून बाहेर पडला असून 20 जणांच्या संघाचा कर्णधार बनलेल्या रुपिंदरला प्रशिक्षणादरम्यान दुखापत झाली. त्याच्या जागी बचावपटू नीलम संजीव जेस या स्पर्धेसाठी खेळणार आहे. रुपिंदरच्या जागी अनुभवी बचावपटू बिरेंदर लाक्रा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल, तर फॉरवर्ड एसव्ही सुनील संघाचा उपकर्णधार असेल. प्रशिक्षक बीजे करिअप्पा म्हणाले, सराव सत्रादरम्यान रुपिंदरला दुखापत झाली आणि तो आशिया कपमधून बाहेर पडला हे भारतीय संघासाठी दुर्दैवी आहे. बिरेंदर आणि सुनील दोघेही अत्यंत अनुभवी आहेत आणि अनेक वर्षांपासून नेतृत्व गटाचा भाग आहेत. आम्हाला रुपिंदरची उणीव भासणार असली तरी आमच्याकडे संघात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आमच्याकडे खेळाडूंचा एक अतिशय प्रतिभावान गट आहे आणि ते या संधीचा फायदा घेण्यासाठी उत्सुक आहेत.