संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

रेल्वे फलाटाच्या बाजूला सेल्फी काढणार्‍यास सहा महिने तुरुंगवास

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- बदलते युग आणि स्मार्टफोनची आवक यामुळे लोकांमध्ये सेल्फी काढण्याची क्रेझ वाढली आहे.आता प्रत्येक व्यक्ती सेल्फी घेऊन आपल्या दैनंदिन जीवनातील विविध आठवणी जपून ठेऊलागला आहे. इतकेच नव्हे तर बहुतेक तरुण आपल्या सोशल मीडियावर सेल्फी अपडेट करत असतात. या सेल्फी काढण्याच्या शर्यतीत लोकांना काय करावे हेच कळत नाही. कधी कधी जीवाचाही धोका पत्करतात. कारण भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे रुळांच्या किंवा रेल्वे फलाटाच्या बाजूला सेल्फी काढल्यास १ हजार रुपये दंड आकारला जातो. यासोबतच सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
रेल्वे कायदा १९८९ हा भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकाला आणि रेल्वेसाठी टाकलेल्या ट्रॅकच्या क्षेत्राला लागू होतो. रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना विविध प्रकारच्या दंड आणि शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५ आणि १४७ मध्ये जीव धोक्यात घालून सेल्फी काढणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मच्या बाजूला सेल्फी काढणे हा दंडनीय गुन्हा आहे. सेल्फी घेताना पकडल्यास आरोपीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. तर दंडासह सहा महिन्याची तुरुंगवास शिक्षाही होऊ शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami