संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

रेल्वे रूळावर बोरं खात बसलेल्या
३ चिमुकल्यांचा धावत्या ट्रेनखाली मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदिगड – पंजाब राज्यात एक दुर्देवी घटना घडली आहे.किरतपूर साहिबजवळ भरधाव रेल्वेखाली सापडून तीन मुलांचा मृत्यू झाला. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.ही मुले रेल्वे रूळावर बोरं खात बसली होती अशी माहिती समोर आली आहे.काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. लोकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातातील तिघा मृत मुलांची नावे नरेंद्र महतो ऊर्फ रोहित (११),विकी चौधरी (७) आणि महेंद्र (७) अशी आहेत. तर जखमी मुलाचे नाव पवन (१० ) असे आहे.ही सर्व मुले झोपडपट्टीत राहणार्‍या मजुरांची आहेत.किरतपूर साहिबजवळ ही चार मुले रेल्वे रुळाजवळ खेळत आणि बोरं खात बसली होती.खेळताना ही मुले इतकी रमली की त्यांना भरधाव वेगात येणारी ट्रेन दिसलीच नाही. काही कळण्याच्या आत ट्रेनने चारही मुलाला जोरदार धडक दिली.या धडकेत तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला.तर एक मुलगा रुळाबाहेर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला.
किरतपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगजीत सिंह यांनी माध्यमांना सांगितले की, मुले रेल्वेरुळाजवळ असलेल्या झाडांवरची बोरं खायला आली होती. दरम्यान,बोरं खाता खाता यातील एक मुलगा रुळावर आला.त्यापाठोपाठ तीन मुलेही रुळावर आली. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका बालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.तसेच एक मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली.गार्डने गंभीर जखमी मुलांना किरतपूर साहिब रेल्वे स्टेशनवर नेले.यानंतर त्यांना रुग्णवाहिकेद्वारे सिव्हिल हॉस्पिटल श्री आनंदपूर साहिब येथे पाठवण्यात आले.यादरम्यान रुग्णवाहिकेतच एका बालकाचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami