संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

‘लंम्पी स्किन” आजारामुळे जुन्नरसह आळेफाटा, बेल्हेतील जनावर बाजार बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जुन्नर- पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात लंम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.आतापर्यंत दोन जनावरांचा या आजाराने बळी घेतला आहे. त्यामुळे गोजातीय जनावरांमध्ये या आजाराचा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून जुन्नर, आळेफाटा आणि बेल्हे येथील जनावरांचे बाजार शनिवार १० सप्टेंबर पासून बंद ठेवण्यात आले आहेत,अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी दिली आहे.
जनावरांचे बाजार बंद ठेवले असले तरी शेळ्या-मेंढ्याचे बाजार मात्र नियमितपणे सुरू राहणार आहेत, याची परिसरातील पशुपालककांनी नोंद घ्यावी असे आवाहनही सचिव रुपेश कवडे यांनी केले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वप्रथम लंपी स्किन झालेले जनावर आढळले होते. त्यानंतर परिसरातील जनावरांचे नमुने घेण्यात आले असता २९ जनावरांना या आजाराचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे प्रमाण आता वाढत चालल्याने बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami