संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

लखनऊमध्ये रामचरित मानसची होळी! उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ -रामचरित मानस वरून निर्माण झालेला वाद आता शिगेला पोचला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी स्वामी प्रसादमौर्य त्यांचे पुतळे जाळल्यानंतर आत मौर्य समर्थकांनी राजधानी लखनऊ मध्ये रामचरित माणसाची होळी केली त्यामुळे युपी मध्ये तणावाचे वातावरण आहे

सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरित मानस बद्दल वादग्रस्त विधाने केली होती. ते म्हणाले होते की रामचरित मानस मध्ये जाती, वर्ण याच्या आधारे जर एका वर्गाचा अपमान करण्यात आलेला असेल तर तो धर्म नसून अधर्म आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या विधानाचा भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध करण्यात आला होता तसेच त्यांच्या या विदानामुळे त्यांच्यावर कलम १५३ अ ,५०२ [२] आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच यूपीतील काही शहरांमध्ये त्यांचे पुतळे जाळण्यात आले होते. त्याच्या दलित आदिवासींमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि आज लखनौमध्येभारतीय ओबीसी महासंघाने मौर्य यांच्या समर्थनार्थ रामचरित मानसची जाहीर होळी केली त्यामुळे यूपीत दोन समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून लखनौ आणि इतर प्रमुख शहरांमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या