संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

लखलखता सूर्य अर्थात शेअर बाजार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोरोना-लॉकडाऊन कालावधीत सगळीकडे स्मशान शांतता असताना, व्यवहार थंडावलेले असताना देशातील शेअर बाजार मात्र तेजीत होता. 2020 मधील कठोर निर्बंधानंतर वर्ष 2021 मध्ये अर्थव्यवस्थेतही काहीशी हालचाल होऊ लागली. निम्म्या मनुष्यबळ व क्षमतेने कंपन्या, आस्थापना कार्यरत होऊ लागले. तसे सेन्सेक्स, निफ्टीच्या रिटर्नचे आकडेही समोर येऊ लागले. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची रक्कमही याच दरम्यान विक्रमी टप्प्याला पोहोचल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सोने-चांदीचे आणि कर्ज व्याजाचे दर यामध्ये मात्र काहीही फरक पडला नाही. एकूणच वैश्विक आजारसाथीतून सावरण्यासह अर्थव्यवस्थाही रुळावर येत असल्याची ही चिन्हे होती.

वर्ष 2022 ची सुरुवात झाली तसा बाजार आणि शेअर उंचावले. अचानक डिमॅट खातेधारकांची संख्याही वाढली. प्रसंगी जमविलेल्या सोने-चांदीचा उपयोगही गुंतवणूकदारांनी केला. शेअर बाजाराने नवगुंतवणूकदारांचे ऐकले. बाजाराचे प्रमुख निर्देशांक तेजीत आले. अनेक शेअर वाढू लागले. या दरम्यान बिटकॉईन, अथेरियमसारख्या क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूकही वाढली.

24 मार्च 2020 रोजीच्या देशव्यापी टाळेबंदीच्या घोषणेनंतर आपटलेला शेअर बाजार एन कोरोना-लॉकडाऊन दरम्यान गुंतवणूकदारांच्या वाढत्या व्यवहारामुळे पुन्हा सावरला आणि तो त्यांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 दरम्यान 2.21 नवे डिमॅट खातेधारक तयार झाले. एप्रिल-नोव्हेंबर 2021 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 17.7 व 18.1 टक्क्यांनी वाढले होते.

या दरम्यान आयपीओही सामान्य गुंतवणूकदारांना आपलेसे वाटू लागले. पेटीएम, नायका, झोमॅटो, स्टार हेल्थसारख्या आयपीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांची उत्सुकसंख्याही वाढली. गेल्या एका वर्षात 500 हून आयपीओ शेअर बाजारात आले. पैकी अनेक त्याच्या इश्यू प्राईसपेक्षा अधिक मूल्यावर सूचिबद्धही झाले. कंपन्यांनीही या माध्यमातून मोठी रक्कम उभी करत व्यवसाय विस्ताराकडे कूच केले. शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, क्षेत्रीय निर्देशांक उंचावू लागले तसे शेअरचे मूल्यही झेपावू लागले. यातून बाजारात व्यवहार करणार्‍या गुंतवणूकदारांची संख्या वाढली. डिमॅट खातेधारक वाढले. आणि शेअर बाजाराचे मार्केट कॅपही विस्तारू लागले.

संपादन – विरेंद्र तळेगांवकर

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami