मुंबई – भारतरत्न लतादीदी यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, दीदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील. अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं हे काँग्रेसची भूमिका आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काल बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासू सुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो, आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते. महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्या आहेत. कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम केलं आहे. वर्षा गायकवाड, अस्लम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते. शनिवार रविवार मुळे अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाहीत. लतादीदी या काँग्रेस परिवारातल्या होत्या. काँग्रेसने भारतरत्न दिला म्हणून नाही पण त्यांचे योगदान एवढे मोठे आहे.