मुंबई- भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.आज लता मंगेशकर यांच्या अस्थी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आल्या. लतादीदींचा अस्थिकलश घेऊन आदिनाथ लता दीदींचे निवासस्थान असलेल्या प्रभू कुंज येथे गेले.
आदिनाथ हे लता मंगेशकर यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र आहेत. लता मंगेशकरांच्या पार्थिवावर बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. लता मंगेशकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. दुसरीकडे, लता मंगेशकर यांच्या कोट्यवधी चाहत्यांनी आणि संगीतप्रेमींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिवंगत भारतरत्न लतादीदींचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच ठिकाणी व्हावे, अशी मागणी केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.