संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

लतादीदींचे स्मारक उभारण्यासाठी मार्गदर्शन करा; अमित देशमुख यांची विनंती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ‘लता मंगेशकर यांचे गायन आणि त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व अलौकिक असे होते. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक राज्य शासनातर्फे उभारण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनी मार्गदर्शन करावे’, अशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी मंगेशकर कुटुंबियांची घरी जाऊन सांत्वन भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लता दीदींच्या धाकट्या भगिनी उषा मंगेशकर आणि बंधू हृदयनाथ मंगेशकर, माजी आमदार उल्हास पवार, संगीतकार मयुरेश पै यावेळी उपस्थित होते.

सुमारे 40 वर्षांपूर्वी लातूरमध्ये प्रथमच एका महाविद्यालयाला दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याची लातूरकरांची विनंती दीदींनी मान्य केली होती, अशी आठवण सांगत मंत्री देशमुख यांनी लता दीदींच्या लातूरशी निगडित आठवणी जागवल्या. दिवंगत विलासराव देशमुख आणि दीदींना एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा बद्दलच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

लतादीदींच्या कार्याचा उचित सन्मान करण्यासाठी उत्कृष्ट असे संगीत संग्रहालय शासनाला उभारता येईल, असे सांगून मंत्री देशमुख यांनी याबाबत मंगेशकर कुटुंबियांचा मानस जाणून घेतला. याबाबतच्या सूचना कुटुंबियांकडून शासनाला पत्राद्वारे कळविण्यात येतील, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami