संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

लता मंगेशकरांची प्रकृती खालावली; व्हेंटिलेटरवर ठेवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पुन्हा प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास अडचण होत असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची डॉक्टरांनी दिली. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी न्युमोनिया आणि कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami