संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

लम्पी त्वचारोगाचा राज्यभर फैलाव
लसीसाठी अजित पवारांची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – देशभरासह राज्यात लम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. जनावर दगावल्याने शेतकर्‍यांच्या दुग्ध व्यवसायावर परिणाम होणार आहे. यावर राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आणि लोकांमधील संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण झाले पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. याशिवाय पालकमंत्री नसताना जिल्ह्यात जर लम्पीसारखे संकट उद्भवल्यास लक्ष कोणी द्यायचे?, असा सवाल यावेळी अजित पवार यांनी केला आहे. शेतकर्‍यांच्या दुग्धव्यवसायावर परिणाम करणार्‍या लम्पी आजाराचा देशासह राज्यातही फैलाव होत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र देणार आहे. यासंबंधित आजाराबाबत नागरिकांमध्ये बरेच समज- गैरसमज आहेत. म्हणजे लम्पी रोग झालेल्या गायीचे दूध प्यायल्याने काय परिणाम होतात? बैल, गाय आणि खोंड यांना हा आजार होतो. मात्र म्हशीला याचे संक्रमण होत नाही. 4 महिन्याच्या पुढे असणार्‍या जनावराला वॅक्सिन देता येत नाही. या सर्व गोष्टींची राज्य सरकारने स्पष्टता दिली पाहिजे. सध्या देशपातळीवर महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये अशा दोनच वॅक्सिन कंपनी आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण झाले पाहिजे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami