संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

लम्पी स्कीन आजाराच्या निर्बंधांमुळे जनावरांचे ऑनलाईन बाजार भरू लागले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली -गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात जनावरांच्या लम्पी स्कीन नावाच्या आजाराचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे.त्यामुळे पशुधन धोक्यात आल्याने शासनाने संसर्ग टाळण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळेही काही शेतकरी घटकांना फटका बसत आहे.यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार भरवायला सुरुवात केली आहे.व्हॉटसॲप आणि फेसबुकचे ग्रुप तयार करून त्यावर जनावरांचे फोटो टाकून शेतकरी जनावरांची खरेदी-विक्री करू लागले आहेत.
प्रामुख्याने सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्ग असे जनावरांचे ऑनलाईन बाजार भरवताना दिसत आहे. सोशल मिडीयाच्या ग्रुपवर जनावराची माहिती पोस्ट केली जात आहे.त्यामध्ये संबंधित जनावरांचे फोटो,त्याचे वय.दातांची संख्या,बैल असल्यास त्याचा शर्यतीत धावण्याचा अनुभव,त्याने वेगवेगळ्या प्रदर्शनात मिळवलेली बक्षिसे,गाय,म्हैस असल्यास त्यांच्या दुधाचे प्रमाण आणि वेत आदि तपशील दिला जात आहे.काही वेळा थेट जनावरांची किंमतही नमूद केली जात आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे मोबाईल संपर्क दिल्याने शेतकरी त्याबाबत चॅटिंग किंवा थेट मोबाईल संभाषण करू लागला आहे.मात्र अंतिम व्यवहार प्रत्यक्ष गोठ्यात जावून जनावर पाहिल्यानंतरच पूर्ण होत आहे.
वास्तविक राज्याच्या पश्चिम भागातील कराड,जत, फलटण,सांगोला,विटा, पंढरपूर,आटपाडी,मिरज आदि ठिकाणच्या जनावरांच्या बाजारात कोट्यवधीची उलाढाल होत असते.गणेशोत्सवापासून हा बाजार तेजीत होता. शर्यतीच्या बैलांची खरेदी -विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती.मात्र काही दिवसांपासून लम्पी आजाराने डोके वर काढल्याने जनावरे दगावू लागली आहेत.त्यामुळे शासनाने संसर्ग टाळण्यासाठी अजनावरांचे बाजारच बंद केले आहे. त्यामुळे असे ऑनलाईन बाजार भरू लागले आहेत. या शेतकऱ्यांच्या कल्पनेचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे.शेतकरी संघटनेचे राज्य पदाधिकारी महादेव कोरे यांनी सोशल मिडीयाने याबाबत चांगला आधार दिला असला तरी शेतकऱ्यांनी अन्य जनावरांसोबत कमी संपर्क ठेऊन खरेदी-विक्री व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami