संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

लम्पी स्कीन आजारीमुळे सर्वांत जास्त जनावरे दगावली बुलढाणा जिल्ह्यात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुलढाणा- देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.महाराष्ट्र राज्यात ३३ जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यात जनावारांना लंपीची प्रचंड लागण झाली असून हा आजार आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळाले नाही. राज्यात सर्वात जास्त जनावरे दगावण्याचे प्रमाण बुलढाणा जिल्ह्यात असून आतापर्यंत ३९९३ गुरे लंपी आजाराने दगावली आहेत. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत.

मागील ४ महिन्यापासून आतापर्यंत ४१ हजार ८९१ जनावरे लंपी आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांचे महत्त्वाचे धन म्हणजे गाय बैल आहे. त्यांच्यावर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावर्षी अगोदरच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून आता लंपी आजाराने शेतकऱ्याजवळ असलेले पशुधन दगावत असल्याने बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे.

जिल्ह्यात लम्पी आजारावर मात करण्यासाठी पशु संवर्धन विभाग सज्ज असून आतापर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र लम्पी आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापपर्यंत यश मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त जनावरे दगावले असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पशुपालकधारकांनी जनावरांचे लवकरात लवकर लसीकरण करावे असे आवाहन पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले यांनी केले आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami