संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

लव्ह जिहाद विरोधात त्रंबकेश्वरमध्ये हिंदू संघटना आक्रमक! विराट मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

त्रंबकेश्वर- लव्ह जिहाद विरोधात त्रंबकेश्वरमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. श्रद्धा वालावलकर या तरुणीची अमानुष हत्या करण्यात आली होती. त्या निषेधात हे आंदोलन करण्यात आले.
हा मोर्चा आज सकाळी छत्रपती शिवाजी चौकातून तेली गल्ली मार्गे बस स्थानकापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर नेण्यात आला.तेथे लव्ह जिहाद बाबतीत काही मान्यवरांनी या वेळी लव्ह जिहादबाबत माहिती दिली.मोर्च्यातील सहभागी झालेल्या सर्वांनी हातात निषेधाचे फलक आणि भगव्या टोप्या घातल्या होत्या.या मोर्चात छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्या जयघोष करीत तर लव्ह जिहाद विरोधात घोषणा देण्यात येत होत्या.
लव्ह जिहाद विरोधात त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरालगत च्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ त्रंबकेश्वर तालुका व शहरातील सर्व हिंदू प्रेमी नागरीकांनी प्रार्थना केली.आनंद आखाड्याचे महंत शंकराने सरस्वती, रघुनाथ महाराज उर्फ फरशीवाले महाराज, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुरेश गंगापुत्र, भुषण अडसरे, वारुणसे बंधु यांच्यासह त्रंबकेश्वर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य, त्रंबकेश्वर देवस्थान चे विश्वस्त, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासह शहरातील युवती, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्याच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लव्ह जिहाद मध्ये हिंदु मुलींना प्रेम प्रकरणात फसवून त्यांच्याशी निकाह करणे, त्यांचे धर्मातरण करणे, त्यांच्या हत्या करणे ,विविध प्रकारचे हिंदू मुलीना त्रास देणे असे प्रकार घडतात.मुस्लीम तरुणाच्या फसव्या जाळ्यात हिंदू मुली अडकवल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे आज हिंदू संघटनानी निषेध केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami