लसीकरणाच्या ‘जुमला व्हर्जनने’ लोकांचे प्राण वाचणार नाही; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधींनी बुधवारी लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्त्र सोडले. लसीकरणाच्या ‘जुमला व्हर्जनने” नागरिकांचे प्राण वाचणार नसल्याचे शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला.

राहुल गांधींनी ट्विट शेअर करत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींच्या एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखाचा फोटो राहुल गांधींनी शेअर केला. अजूनही देशातील मोठ्या लोकसंख्येला लसीचा एकही डोस मिळाला नसल्याच्या वस्तुस्थितीकडे सोनिया गांधींनी या लेखातून लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने तातडीने लसीकरणाचा वेग वाढवून अधिकाधिक नागरिकांना लसीकरणाच्या कक्षेत आणण्याचा सल्ला सोनियांनी या लेखातून दिला. या लेखासोबत राहुल गांधींनी लसीकरणाच्या “जुमला व्हर्जनने” नागरिकांचे प्राण वाचणार नाही असे ट्विट टाकले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनीही हा लेख शेअर केला. लसीकरणाचा वेग वाढवून सर्वांनाच मोफत लस पुरविण्याची गरज असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले आहे. याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही हा लेख शेअर करत केंद्रावर टीका केली आहे.

Close Bitnami banner
Bitnami