संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

लहान थांब्यावर एसटी बस थांबवली नाही तर कारवाई!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘गाव तिथे एसटी’ ही संकल्पना आहे. मात्र, काही चालक गावातील लहान थांब्यावर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात.अशा बर्‍याच तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत.त्यामुळे महामंडळाने आता थांब्यावर बस न थांबविल्यास यापुढे चालकाला दोषी धरून कारवाई केली जाणार आहे. यामध्ये वाहकाला सुद्धा दोषी धरण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोईसाठी थांबे निश्चित करण्यात आले असल्याने अशा ठिकाणी बस थांबविणे चालकाचे प्रथम कर्तव्य आहे.प्रवासी थांब्यावर बसेस न थांबविल्याबाबतच्या तक्रारी महामंडळाकडे येऊ लागल्या आहेत.त्यामुळे चालकांना याच्या सूचना देण्यात आल्या आहे.काही थांब्यावर बस थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.बसची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.गावातील अंतर्गत रस्त्यावर लहान थांबे आहेत. मात्र, प्रवासी न पाहताच चालक गाडी पुढे नेतात. त्यामुळे एसटीची वाट पाहणाऱ्या खेड्यापाड्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होते.यासंदर्भात बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याने महामंडळाने नियोजित थांब्यावर बस न थांबविल्यास चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami