संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

लहान व्यापाऱ्यांसाठी Paytm देतंय पाच लाखांचे कर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लहान व्यापाऱ्यांसाठी Paytm ने खास योजना आणली आहे. या योजनेतून Paytm धारक कोणत्याही गॅरेंटीशिवाय ५ लाखांचे कर्ज घेऊ शकणार आहे. तसेच, हे कर्ज तुम्ही रोज EMI भरूनही फेडू शकता. Paytm ने या संदर्भात शेड्यूल्ड कमर्शियल बँका आणि NBFC सोबत भागीदारी केली आहे.

जर तुम्ही छोटे व्यापारी असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही या कर्जासाठी अर्ज केला पाहिजे. त्यासाठी आधी तुम्हाला पेटीएम फॉर बिझनेस अ‍ॅपमधील ‘Merchant Lending Program’ मध्ये जावे लागेल. Paytm चे अल्गोरिदम तुमच्या किंवा व्यापाऱ्याच्या डेली ट्रान्सझॅक्शनच्या आधारे Credit-worthiness तपासेल.

कर्ज मिळविण्यासाठी काय कराल?

सर्वात आधी तुम्हाला Paytm for business हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तिकडे असलेल्या बिझनेस लोन आयकॉनवर टॅप करून तुम्हाला उपलब्ध असलेली ऑफर तपासा.

तुम्हाला हवी असलेली रक्कम निवडल्यावर लोन अमाउंट, डिस्बर्स अमाउंट, Total Payable, Daily Installment, Tenure इत्यादी डिटेल्स पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला डिटेल्स द्यावे लागतील. त्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जाण्यासाठी ‘Get Started’ वर टॅप करा. तुमचा कर्जाचा अर्ज लवकर पूर्ण करण्यासाठी CKYC कडून तुमचे KYC डिटेल्स मिळवण्यासाठी संमती देऊ शकता.

पुढील स्क्रीनवर, तुम्ही तुमचा पॅन कार्ड डेटा, जन्मतारीख आणि ई-मेल अ‍ॅड्रेस यासारख्या डिटेल्सचे व्हेरीफिकेशन करू शकता. जर हे फील्ड भरले नाहीत तर ते भरा आणि पुष्टी करा. एकदा हे पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑफरच्या पुष्टीकरणासह पुढे जाऊ शकता. पॅन डिटेल्स व्हेरिफाय केल्यानंतर, तुमचा क्रेडिट स्कोअर व्हेरिफाय केला जाईल आणि KYC चे व्हेरीफिकेशन केले जाईल. तुमचा कर्ज अर्ज सबमिट केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक डिटेल्स इत्यादी काळजीपूर्वक भरा.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami