मुंबई – मेघवाडीच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना लाच देताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.
मेघवाडी आणि जोगेश्वरी या दोन्ही पोलीस ठण्यांचा चार्ज सुजाता पाटील यांच्याकडे होता. त्यांनी जोगेश्वरीतील तक्रारदाराकडे एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील ४० हजारांचा पहिला हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याशिवाय परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असा आदेश त्यांना दिला आहे.