मुंबई – लालबागातील गगनचुंबी ‘वन अविघ्न पार्क` इमारतीच्या 22व्या मजल्यावर आज सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसून या आगीत 22 व्या मजल्यावरील रुम पूर्ण जळून खाक झाला. ही आग विझवताना अग्निशमक दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली.
लालबागच्या माधव पालव मार्गावर वन अविध्न पार्क ही 60 मजली इमारत आहे. या इमारतीमधील 19 व्या मजल्याचा 2021 मध्ये आग लागली होती. अशा परिस्थितीत आज सकाळी पुन्हा या इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग 21 व्या मजल्यावरील एका रुमला लागल्याने अग्निशमक दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. या रुममधील आगीचे झळ बाहेर निघत होत्या. तेथून आगीचे धुर प्रचंड निघत होता. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीचे कारण अद्याप उघड झाले नसले तरी ही आग शेटसर्किंगमुळे लागली असावी, अशा अंदाज वर्तवला जात आहे.