संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

लालबाग राजाच्या दानपेटीत ४ दिवसांत दीड कोटीचे दान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत चार दिवसांत दीड कोटींचे दान जमा झाले आहे. आजवरचा तो नवा विक्रम आहे. गणेशभक्तांनी राजाच्या चरणी रोख रकमेसह २०० तोळे सोने आणि १ किलो ७०० ग्रॅम चांदी दान केली आहे.
मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळांपैकी लालबागचा राजा एक मंडळ आहे. दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेतात. त्यासाठी भाविकांची २-३ किलोमीटरपर्यंत रांग लागते. नवसाला पावणारा अशी त्याची भाविकांमध्ये ख्याती आहे. या लालबाग राजाच्या चरणी गणेशभक्तांनी सढळहाताने भरघोस दान दिले. त्यामुळे चार दिवसात दीड कोटींचे दान जमा झाले. दरवर्षाच्या आकडेवारीची सरासरी पाहता या दानाच्या रकमेने विक्रम केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी ४ ते ५ कोटींचे दान जमा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दानपेटीत रोख रक्कम, नाणी आणि सोने-चांदी यांचा समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami