संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

लालबाग राजाला ५ कोटीचे रोख दान तर सव्वा किलो सोन्याचा मोदक !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेल्या लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला यंदाही भक्तांनी भरभरून दान दिले आहे. यंदा लालबाग राजाच्या चरणी एकूण साडेसहा कोटींचे दान मिळाले असून त्यामध्ये पाच कोटी इतकी रोख रक्कम आहे.तसेच एका भक्ताने सव्वा किलो सोन्याचा मोदक तर एकाने चक्क हिरो होंडा बाईक लालबाग राजाला दान स्वरुपात अर्पण केली होती.
‘नवसाला पावणारा गणपती ” अशी ख्याती असलेल्या मुंबईतील लालबाग राजाच्या दर्शनासाठी जगभरातील गणेश भक्त हजेरी लावत असतात.हे भक्तगण आपल्या कुवतीनुसार या गणेशाला नवस बोलून ते दान त्याच्या चरणी अर्पण करत असतात.यंदा लालबाग राजाला मिळालेल्या दानातील वस्तूंचा लिलाव परवा गुरुवारी पार पडला.त्यासाठी २०० भक्तांनी आपली हजेरी लावली होती.या लिलावात असलेला सव्वा किलो सोन्याचा मोदक एका महिलेने ६० लाख ३ हजार रुपयांची बोली लावत घेतला.तर एका भक्ताने लालबाग राजाला मिळालेली हिरो होंडा बाईक ६६ हजाराच्या बोलीने विकत घेतली.तसेच साडे सतरा तोळे सोन्याचा हर साडे आठ लाखाच्या बोलीत विकला गेला.याशिवाय १ किलो वजनाचे सोन्याचे चॉकलेट आणि बिस्किटचाही यावेळी लिलाव करण्यात आला.या लिलाव प्रक्रियेतून लालबाग राजा मंडळाला १ कोटी ३० लाख रुपये मिळाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami