संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 18 August 2022

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली; दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गेले काही दिवस गंभीर आहे. घरातील जीन्यावरून पडल्यामुळे लालूप्रसाद यांच्या खांद्याला आणि पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे पाटणा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे बुधवारी ६ जुलै रोजी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत हलविण्यात आले असून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मंगळवारी ५ जुलै रोजी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र संध्याकाळी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. आता पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांनी दिली. तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यादव यांचा ऑक्सिजनवर असल्याचा फोटो शेअर केला होता.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे देशातील प्रसिद्ध नेते आहेत. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आले आहेत. ते पाटणा येथील राबडी देवी यांच्या १० सरकयुलर रोड या शासकीय निवास्थानी राहत आहेत. रविवारी सकाळी लालूप्रसाद यादव हे जीन्यावरून पडल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पाटणा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनेकजण त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami