लिस्बन : वेतनवाढ तसेच अन्नधान्याच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी लिस्बन येथे हजारो आंदोलका रस्त्यावर उतरले होते. शनिवारी लिस्बनच्या डाउनटाउनमध्ये सरकारविरोधात आंदोलन पुकारले.
जे कामगार उत्पादन करतात त्यांना काहीही मिळत नाही. संपूर्ण नफा हा मालकांसाठी आहे आणि आमच्यासाठी काहीही नाही, अशा घोषणा करत हे आंदोलन कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. पोर्तुगाल हा पश्चिम युरोपमधील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. येथील कामगारांना अगदी कमी वेतनामध्ये काम करावे लागते. त्यात अन्नधान्याच्या किमतीही वाढवून ठेवल्या आहेत. याचा निषेध म्हणून हे कामगार सरकारविरोधात आंदोलन करत आहे. पोर्तुगालची सर्वात मोठी सीजीटीपी या युनियनकडून हा निषेध पुकारला आहे. वेतन आणि निवृत्तीवेतन ताबडतोब मिळावे आणि किमान त्यात १०% वाढवण्याची मागणी कामगारांनी या आंदोलनातून सरकारकडे केली आहे. तसेच सरकारने गरजेच्या खाद्यपदार्थांच्या किंमतीवर मर्यादा घालावी अशी त्यांची मागणी आहे.
समाजवादी पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांना शिक्षक, डॉक्टर, रेल्वे कर्मचारी आणि इतर व्यावसायिकांच्या रस्त्यावरील निषेध आणि संपाचा सामना करावा लागत आहे. यावर पोर्तुगालचे अर्थव्यवस्था मंत्री अँटोनियो कोस्टा सिल्वा यांनी अन्नधान्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारी कोणताही हस्तक्षेप करू शकत नसल्याचे म्हटले आहे. कारण मागील दोन वर्षत वेतन वाढही ३.६ वरून ४. ८३ करण्यात आले होते. तर फळे आणि भाज्या यांसारख्या प्रक्रिया न केलेल्या अन्न उत्पादनांच्या किमती वाढल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.