संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

लुडो गेमवरून भाईंदर लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणांवरून प्रवाशांचे नेहमीच वाद होत असतात. पण भाईंदर लोकलमध्ये लुडो गेम् वरून प्रवाशांची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन प्र्वाशा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

आज सकाळी साडेअकरा वाजता भैन्दार्वरून चर्चगेट लोकल सुटली. त्यानंतर मीरा रोड ते दहिसर दरम्यान लोकल येताच लुडो खेळण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की त्यातून हाणामारी सुरु झाली. यावेळी लोकलमधील अन्य प्रवाशांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या प्रकरणी दहिसर लोहमार्ग पोलिसांनी दोन प्रवाशांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

लोकलमध्ये जुगार आणि ल्युडोसारखे गेम खेळणाऱ्या प्रवाशांचे काही ग्रुप आहेत. आणि कधी कधी त्यांच्यात वादावादी सुद्धा होत असते. याबाबत रेल्वे पोलिसांनी यापूर्वी अनेक वेळा कारवाई करून सुद्धा हे प्रकार थांबलेले नाहीत. मात्र अशा घटनांमधून इतर प्रवाशांना नाहक त्रास होत असतो. आता लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली असल्याने पूर्वी प्रमाणेच लोकलमध्ये गर्दी होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami