पुणे – ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासोबत त्यांचे घरोब्याचे संबंध होते. ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे गुरुवारी दुपारी पुण्यातील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे साहित्य विश्वात दुःख व्यक्त केले जात आहे. जोशी यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२७ रोजी रत्नागिरीत झाला होता. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या शिष्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर शेजारी असल्यामुळे लहानपणापासून त्यांचे सावरकरांसोबत घरोब्याचे संबंध होते. कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. देशभक्त, अध्यात्म, काव्य लेखन यावर त्यांचा भर होता.