संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 06 October 2022

लोकप्रिय ब्राझिलियन फुटबॉलपटू काका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज लोकप्रिय ब्राझीलियन फुटबॉलपटू काकाचा वाढदिवस. त्याचा जन्म २२ एप्रिल १९८२ रोजीचा. ‘काका’ या आपल्याला जवळच्या वाटणाऱ्या नावाच्या फुटबॉलपटूचे पूर्ण नाव आहे ‘रिकार्दो इझेक्सों दोस सान्तोस लेइत’ आहे.

जगातील सर्वात श्रीमंत १० फूटबॉलपटूंपैकी एक खेळाडू असलेल्या काका ब्राझील फुटबॉल संघामध्ये २००१ पासून खेळत होता. फुटबॉल हा अलीकडे धसमुसळा खेळ झाला असला, तरी काका या खेळासाठी ओळखला जात नाही. अतिशय वेगवान खेळ करणारा, मोक्याच्या क्षणीही डोके शांत ठेवून खेळणारा म्हणून काका ओळखला जात असे. २००१ साली साओ पाउलो मधून त्याने आपल्या करियरला सुरूवात केली. काकाने २००२, २००६ व २०१० ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. काका एसी मिलान क्लबतर्फे खेळतो. काका हा ब्राझिल या राष्टीय टीमकडून सुमारे ९५ सामने खेळला आहे. २००३ साली एसी मिलान सोबत काकाची गट्टी जमली आणि त्याचं करियर नव्या उंचीवर गेलं.

सहा वर्ष काका मिलानसोबत होता. या दरम्यान काकाने स्कुडेट्टो २००३-०४), सुपरकोप्पा इटालियाना (२००४), यूईएफए सुपर कप (२००७), फीफा क्लब विश्व कप (२००७) आणि चॅम्पियन लीग ((२००७) मध्ये किताब मिळावले होते. २००९ साली ‘रिएल’ ने काकाची खरेदी सुमारे ६.७ करोड युरोमध्ये केली. या सोबत कोपा डेल रे (२०१०-११) आणि स्पेनिश लीग (२०११-१२) मध्ये किताब मिळवण्यास मदत केली.

काका हा २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा व त्याच साली फीफाचा सर्वोत्तम खेळाडू (‘प्लेअर ऑफ द इयर’) या पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू होत. त्याला हा पुरस्कार देण्यासाठी स्वत: पेले हजर होते, हा ब्राझीलच्या फुटबॉलचा मान म्हणायला हवा. डिसेंबर २०१७ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी ‘काका’ या ब्राजीलच्या खेळाडूने खेळातून संन्यास घेतला. यापुढे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची इच्छा त्याने प्रकट केली होती.

  • संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami