संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

लोकल ट्रेनबाबत लवकरच नवीन नियमावली; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – लोकल ट्रेनमध्ये दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांनाच प्रवास करण्यास मुभा या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले की, लवकरच राज्य सरकार नवीन नियमावली जाहीर करणार आहे. त्यामुळे, दोन दिवसांचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. या याचिकेवर पुढील सुनावणी 2 मार्च रोजी ठेवण्याचा निर्णय मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिला.

निर्बंध शिथिल करण्यासाठी नवीन नियमावली तयार आहे. त्यामध्ये लोकल ट्रेन प्रवासासाठीसुद्धा नवी नियमावली तयार केली आहे. त्यावर राज्याच्या मुख्य सचिवांची स्वाक्षरी अद्याप बाकी आहे. राज्य सरकार सध्याच्या युक्रेनमधील उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चिंतेत आहे. तेथील भारतीय विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची सुटका करण्याच्या कार्यात व्यस्त असल्याने वेळ लागत आहे. तसेच, राज्य सरकार दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करणार, असे राज्याचे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami