संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

लोकशाहीवर भन्नाट भाषण करणाऱ्या कार्तिकवर डॉ. लहानेंकडून उपचार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – प्रजासत्ताक दिनी शाळेत लोकशाहीवर भाषण करणाऱ्या अंबड तालुक्यातील रेवलगावच्या कार्तिक वजीर या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. त्यांनतर कार्तिक राज्यभरात प्रसिद्ध झाला. राजकीय नेते, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आचार्य व्यक्त करत त्याचे कौतुक केले. दरम्यान कार्तिकला दृष्टिदोष असल्याचे समजले. अशातच कार्तिकवर उपचार करण्याची जबाबदारी समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी घेतली. नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या देखरेखीत कार्तिकवर उपचार केले जातील असे सांगण्यात आले.

समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कार्तिकचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून त्याला उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचार करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आज समृद्धी कारखान्याच्या संचालिका वैशाली घाटगे यांनी कार्तिकला मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. या ठिकाणी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी कार्तिकच्या डोळ्याच्या तपासण्या केल्या. मुख्यमंत्री सहायता निधी आणि समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या मदतीतून त्याच्यावर लवकरच उपचार करण्यात येणार आहे. समृद्धी साखर कारखाना त्याच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे वैशाली घाटगे यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या