संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

लोन अ‍ॅपवर होणाऱ्या बदनामीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे : पुण्यासह अनेक शहरात या सायबर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.पुण्यात लोन अॅपवरुन होणाऱ्या बदनामीला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची बाब समोर आली आहे.कर्ज फेडण्यासाठी शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित तरुणाच्या कुटूंबियांनी केला आहे.याबाबत पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेतल्यानंतर सायबर चोरट्यांकडून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांना लुबाडले जाते. अनेकांकडून ऑनलाईन अॅपवर लोन घेतले जातात आणि त्यातून फसवणूक झाल्याचा प्रकार सातत्याने घडताना दिसतो. असाच प्रकार पुण्यातील 25 वर्षाय तरुणाबरोबर घडला आहे. एक कर्ज फेडण्यासाठी या तरुणाने दुसरे कर्ज काढले. असे जवळपास 5 ते 6 अॅपवरुन वेगवेगळे कर्ज काढले. मात्र कर्जाचे हफ्ते फेडता येत नसल्यामुळे सातत्याने कर्ज देणारे व्यक्ती फोन करुन शिवागाळ करायचे.या सर्व प्रकाराला कंटाळून या तरुणाने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अशी माहिती तरुणाच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami