नागपूर- उदयपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे.या अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर सुरजागड येथील लोहखनिज खाणीच्या विस्तारावरून नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा आहे. त्यामुळे विधानभवन आणि आसपासच्या परिसराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशनसुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नक्षल्यांनी सरकारला इशारा दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा असा इशारा नक्षलवाद्यांनी राज्य सरकारला दिला आहे. जर सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा असं आवाहनही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून केलं आहे. बदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्यूरोने आज हे प्रेस रिलीज काढली आहे..
सुरजागड या ठिकाणी आदिवासींचं पूजा स्थळ असतानाही स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता २०१४ नक्षलवाद्यांचा मधील भाजप सरकारने स्थानिक आदिवासींच्या तत्कालीन जनसंघर्षाला चिरडून टाकत सुरजागड खाणीत खोदकाम सुरू केले होते. शेकडो हेक्टर क्षेत्रात खोदकामामुळे परिसराची प्रचंड पर्यावरणीय हानी होत असून सर्व प्रकारचं प्रदूषण ही वाढलं आहे. असे असताना सुरजागड मधून आतापर्यंत दरवर्षी तीन मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी असताना आता सरकार ने दर वर्षी दहा मॅट्रिक टन लोह खनिज काढण्याची परवानगी बहाल केली आहे..