संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

वक्फच्या संपत्तीची चौकशी करा! उत्तरप्रदेश सरकारने आदेश दिले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बिहार : उत्तरप्रदेशात मदरशांच्या पाठोपाठ आता वक्फ बोर्डच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकार वर्षानुवर्षे वक्फमध्ये ठेवलेली सरकारी आणि सार्वजनिक मालमत्ता परत घेण्याचा विचार करत आहे.सर्व जिल्ह्यांतील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची महिनाभरात चौकशी करावी लागेल, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.यूपी सरकारने याबाबत सर्व आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

सध्या उत्तरप्रदेशात सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया वक्फ बोर्ड अस्तित्वात आहेत. उत्तर प्रदेशातील शिया-सुन्नी वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात वक्फ मालमत्तांची नोंद आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारीसुद्धा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवैध मदरशांच्या सर्वेक्षणानंतर आता वक्फ बोर्डाच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने काँग्रेसचा 33 वर्षे जुना आदेश रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सार्वजनिक मालमत्तांची वक्फ मालमत्ता म्हणून नोंदणी करण्यात यावी हा आदेश महसूल कायदे आणि वक्फ कायदा या दोन्हींच्या विरोधात असल्याने आता हा जुना अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. सार्वजनिक जमिनीची वक्फ मालमत्तेत नोंद झाली असेल तर ती रद्द करुन मूळ स्वरुपात महसूल विभागाला नोंदणी करण्यात येईल,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ विभागाचे उपसचिव शकील अहमद सिद्दीकी यांच्या वतीने उत्तर प्रदेशातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना पत्र पाठवून सर्व भूखंडांची माहिती महिनाभरात मागवली आहे. यासोबतच नोंदी दुरुस्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील शिया-सुन्नी वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात वक्फ मालमत्तांची नोंद आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. 15 ऑक्टोबरपर्यत सर्वेक्षण पूर्ण करुन सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami