कोल्हापूर – शुल्लक कारणावरून वडिल रागावल्याने मुलीने वडिलांचीच हत्या केली आहे. इचलकरंजी शहरात ही घटना घडली. याप्ररकरणी पोलिसांनी मुलीला अटक केली आहे.
इचलकरंजीमधील बर्वेमळा भागात शांतीनाथ केत्काले हे पत्नी आणि तीन मुलींसह राहतात. मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून घरात वाद झाला होता. त्यातून झालेले भांडण इतके विकोपाला गेले की शांतीनाथ आपल्या मुलींवर चांगलेच भडकले. पण वडील भडकताच शांतीनाथ यांची थोरली मुलगी साक्षी हिने लोखंडी गजाने वडिलांवर हल्ला केला. तिने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शांतीनाथ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी साक्षीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे.