संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

वरळीत ’आजचा छावा, उद्याचा वाघ’ तेजस ठाकरेंच्या नावाचे होर्डिंग्ज झळकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे एकीकडे आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे आता राजकारणात एंट्री करणार अशी चर्चा रंगली आहे. अशातच ‘आजचा छावा, उद्याचा वाघ,’ असे उल्लेख असलेले होर्डिंग्ज आज मुंबईत लागले होते. तेजस ठाकरेंची राजकारणातील सक्रिय प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आज वरळीत तेजस ठाकरे यांचे होर्डिंग्ज लागल्याचे दिसून आले. तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर वरळीत लागले आहे. शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांचे भाऊ निशिकांत शिंदे यांनी हे होर्डिंग्ज लावले आहे. विशेष म्हणजे वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या होर्डिंग्जची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर तेजस ठाकरे कोल्हापूरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचे दर्शन घेतले होते. तेजस ठाकरे राजकारणात आले तर नवल वाटायला नको, असे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तेजस ठाकरे हे शिवसेनेच्या राजकीय कार्यक्रमात आतापर्यंत फारसे दिसले नाहीत.2019 साली अहमदनगरमध्ये तेजस ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव मुंबईत आले होते, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर राव यांची भेट घेतली होती.वन्यजीव संशोधनामध्ये तेजस ठाकरे यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात एंट्री करणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami