संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

वरावरा रावांचा उपचारासाठी हैदराबादला जाण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेतील आरोपी ज्येष्ठ तेलुगू कवी वरावरा राव यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयानकडे हैदराबादमध्ये जाऊन डोळ्याचे ऑपरेशन करण्याकरिता परवानगीचा अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने आरोपी वरावरा राव यांचा अर्ज फेटाळला आहे.

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद माओवाद्यांशी संबंध प्रकरणी 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आजारपणाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात वरवरा राव यांना कडक अटी शर्तींवर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यावेळी वैद्यकीय जामीनाचा कालावधी संपण्यापूर्वी शरण येण्याचे निर्देश दिले होते. राव सध्या मालाड येथे भाड्याने राहत असून पुढील उपचारांचा खर्च त्यांना परवडत नसल्याने त्यांना हैदराबाद येथील निवासस्थानी जाण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच राव यांचा जामिनाचा अवधीही वाढविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका वरवरा राव यांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे.वरावरा राव यांना मुंबई सत्र न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या जामीन अर्ज मंजुरी केल्यानंतर घालून देण्यात आलेल्या नियम व अटीच्या आधारे मुंबई सोडून कुठेही जाण्याची परवानगी मागणे बंधनकारक आहे.त्यानुसार वरावरा राव यांनी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी हैदराबादला जाण्यासाठी न्यायलयाकडे परवानगी मागितली असता न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami