संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

वर्षा बंगल्यावर अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानावरुन आज राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी आज दुपारी वर्षा निवासस्थानीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. सरकार आश्वासने पाळत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी,अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याला विरोध करा,अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यावेळी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अतिवृष्टीमु स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी. महाराष्ट्रात कृष्णा नदीला कोयना, पंचगंगा, दुधगंगा व वारणा या उपनद्या मिळतात. महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून सुमारे 235 कि.मी.अंतरावर कर्नाटक राज्यात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण बांधण्यात आले आहे.

अलमट्टी धरण बांधल्यापासून कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात मोठया प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन नदीकाठच्या गावात पाणी घुसते. त्यामुळे नदीकाठची गावे, शेती व गुरे यांचे अतोनात नुकसान होते. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व आजपर्यंतच्या महापूर आणि अतिवृष्टी वेळची स्थिती पाहता अलमट्टी धरणाची उंची वाढविणे संयुक्तीक होणार नाही. तरी महाराष्ट्र शासनाने या विषयी केंद्रशासन व कर्नाटक सरकार यांचेकडे पाठपुरावा करुन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविषयी प्रखर विरोध करावा, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची आदेश दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami