संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

वऱ्हाडाच्या गाडीला अपघात! नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हरदोई :- उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील पचदेवरा पोलीस स्थनकाच्या हद्दीतील दरियाबाद गावाजवळ झालेल्या एका भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. नरवदेवाला घेऊन जाणारी एका भरधाव बोलेरो कारचा आणि अनंगपूरवरुन येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. या धडकेमुळे नियंत्रण सुटलेली बोलेरो बाजूच्या कालव्यामध्ये पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. लग्नघरांमध्ये यामुळे शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी कुडा गावातील रहिवासी असलेल्या ओंबीर यांचा २१ वर्षीय मुलगा देवेश याचा विवाह सोहळा होता. शाहजहानपूरच्या कात गावात राहणाऱ्या नवरीमुलीच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार होता. यासाठी नवरदेवाकडील वऱ्हाड कात गावाकडे निघाले होते. यावेळी वाटतेच नवरदेवाच्या बेलोरो कारला भयानक अपघात झाला. बोलोरो कार भरधाव वेगाने निघाली होती. चालकाला मध्येच ऊसाने भरलेल्या ट्रक दिसला. या ट्रकला धडक होऊ नये यासाठी चालकाने प्रयत्न केला. मात्र, ट्रकची धडक चुकवण्याच्या प्रयत्नात बोलोरो कार थेट कालव्यात पडली. या कारमध्ये नवरदेवासह त्याचे पाच नातेवाईक बसले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले, तर नवरदेवासह त्याच्या पाच नातेवाईकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या