संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

वसमत परिसरात एकाची चाकूने भोसकून हत्या केल्याने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

हिंगोली- हिंगोलीच्या वसमत येथील बसस्थानकासमोरील पवन हॉटेलजवळ एकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अंबाजी गायकवाड (60) असे मृताचे नाव आहे. खुनाचा नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गायकवाड हे औरंगाबाद येथे राहणारे असून ते काही दिवसांपूर्वीच वसमत येथे आले होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते बसस्थानकासमोरील पवन हॉटेलजवळ आले होते.यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपींनी पलायन केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना मदतीसाठी ओरडण्याची संधीही मिळाली नाही. पोटात चाकूने चार वार झाल्यामुळे ते जागीच कोसळले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गायकवाड यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami