संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार! आठ दिवसात दुसरा बळी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भंडारा – आठवडाभरापूर्वी भंडारा जिल्ह्याच्या इंदोरा जंगलात मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचा बळी घेणाऱ्या सीटी- एक वाघाने आज शुक्रवारी पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी घेतला. शेतातील पिकाची पाहणी कराण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केले.

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात आज शुक्रवारी सकाळी घटना घडली. या वाघाची ही तेरावी शिकार असून लाखांदुर तालुक्यातील चौथी घटना आहे. तेजराम बकाराम कार ( ४५) रा. कन्हाळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते गावातील मनोज शालिक प्रधान (३०) यांच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. हा थरार पाहून मनोजने प्रचंड आरडा ओरड केली.या घटनेची माहिती मोबाईलवरून गावकऱ्यांना दिली.गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती देताच वन परिक्षेत्राधिकारी यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami