संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

वाघूर धरणावर रेषाळ बगळातपकिरी खाटीक पक्ष्यांचे दर्शन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव – जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षिमित्रांनी वाघूर धरण परिसरात पक्षीगणना केली. त्यात ६८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेषत: रेषाळ बगळा आणि तपकिरी खाटीक हे हिवाळी पाहुणे म्हणून गणल्या जाणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे. पाणथळ पक्षांचे अस्तित्व हे पाणथळ जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. या पार्श्र्वभूमीवर पक्षिमित्र अभ्यासाक शिल्पा गाडगीळ, राजेंद्र गाडगीळ, बाळू महांगडे यांनी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगाव तालुक्यातील वाघुर धरणावर  पक्षीगणना केली.या गणनेत पाणथळ पक्षांत प्रामुख्याने वारकरी २१८, छोटा पाणकावळा ९० सोबत अल्प संख्येने गडवाल, तरंग, थापट्या, भुवई बदक, लालसरी, साधा पाणलाव, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी, काळ्या शेपटीचा मालगुजा, कंठेरी चिखला, पाणकाडी बगळा, मोरशराटी, काळा शराटी, शेकाट्या, चिखल्या, हिवाळी सुरय, पांढुरका हरीण, उघड्या चोचीचा करकोचा, आशियाई कवडी मैना, करडा धोबी, हिरवा बगळा, पांढऱ्या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, युरेशियन दलदल इत्यादी पाणपक्ष्यांची नोंद केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami