संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

वाढदिवसाच्या दिवशीच अभिनेत्रीचागूढ मृत्यू! पतीवर खूनाचा आरोप

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

त्रिवेंद्रम-केरळमधील तरुण अभिनेत्री आणि मॉडेल सहानाचा तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच गूढ मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. सहानाने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या पतीने केला आहे. तर नवऱ्याने हत्या केल्याचा आरोप सहानाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अभिनेत्री सहानाचा १२ मे २०२२ रोजी २१ वा वाढदिवस होता. तिने तो साजरा केला. त्यानंतर १३ मे रोजी रात्री १ च्या सुमारास तिच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची बातमी कळाली. सहानाने आत्महत्या केली असल्याचे तिचा नवरा साजिदने सांगितले. तर सहानाने आत्महत्या केली नसून तिच्या नवऱ्यानेच तिची हत्या केली आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यामुळे पोलिसांनी साजिदला ताब्यात घेतले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami