संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

वातावरण बिघडवू नका, शांतता राखा; गृहमंत्र्यांनी राजकीय पक्षांनाही दिली तंबी!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करू पाहणाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली असताना कर्नाटकात विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थिनींच्याविरुद्ध हिंसक चिथावणी दिली जात आहे. राजकीय पक्षांनी देखील यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर हिजाब प्रकरणावरून आंदोलन होण्याची परिस्थिती पाहाता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील नागरिक आणि राजकीय पक्षांना देखील तंबी दिली आहे.

कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी इशारा दिला आहे. पोलीस विभागाचे काम वाढवू नका, असे सांगत गृहमंत्री वळसे-पाटील यांनी राजकीय पक्षांना तंबी दिली आहे. राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा, असे यावेळी त्यांनी आवाहन केले. हिजाबवरून राज्यातील वेगवेगळ्या भागात जे आंदोलन सुरू आहे त्याबाबत गृहविभागाने पूर्ण तयारी केली आहे. सर्व प्रमुख अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. त्याचवेळी जर आंदोलन झाले तर ते शांततेत पार पाडा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच दिलीप वळसे पाटील यांनी हिजाब मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना “परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका”, असे आवाहन करत, “जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं”, असे सांगताना या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना देखील तंबी दिली.

“जे मी सामान्य नागरिकांना सांगितलं तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये”, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami