संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 07 February 2023

वादग्रस्त विधानांनंतर सत्तार बॅकफूटवर! बुलढाणा दौराही अचानक रद्द केला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार अज्ञातवासात गेल्याचे वृत्त समोर आले आहे. कारण आज त्यांचा बुलढाणा दौरा देखील त्यांनी रद्द केल्याने सध्या ते नॉट रिचेबलच असल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचल्यानंतर सत्तार यांनी आजचा बुलढाणा जिल्ह्यातला दौरा रद्द केला असल्यची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सत्तार यांच्याविरोधात राज्यभरातुन निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वच स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. अशावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या नॉट रीचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

सत्तार मंगळवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. त्यानंतर चांगेफळ येथील अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार होते. मात्र, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचे समजते. . अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यांनंतर काही वेळातच त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून आक्रमक पवित्र घेतला होता. त्यानंतर सॉरी म्हणत त्यांनी आपण असे म्हटलेच नाही असे म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज दिली. त्यांना पुन्हा माफी मागण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनी सिल्लोड येथील जाहीर सभेत पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे सध्या त्यांच्याविरोधात राज्यभरात वातावरण तापले असल्याचे चित्र समोर येत असतानां, आता त्यांना सध्या अज्ञातवासात राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी आज त्यांचा बुलढाणा दौराही रद्द केला असल्याचे समोर आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami