वापी- गुजरातच्या वापीमध्ये एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी गॅरेजशेजारी चारचाकी तसेच ८ ते १० दुचाकी उभ्या होत्या. या सर्व गाड्या आगीत जळून खाक झाल्या. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यात चारचाकी तसेच दुचाकी भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाले.