संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

विख्यात गोलंदाज फाझल महमूद यांचा जन्मदिन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पाकिस्तानचे विख्यात गोलंदाज फाझलमहमूद यांचा जन्मदिन. जन्म १८ फेबुवारी १९२७ रोजी झाला.
फाझल महमूद यांचा मुख्यत्वे भर स्विंग आणि टप्प्यावर असे. ‘पाकिस्तानचे अलेक बेडसर’ असे त्यांना संबोधले जाई. पाकिस्तानचे जलद गोलंदाज फझल मेहमूद हे फाळणीची वेळ आली नसती तर १९४७-४८ मध्ये ते भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुध्द खेळले असते पण फाळणीनंतर १९५२ मध्ये दिल्ली येथे पाकिस्तानच्या पहिल्या कसोटीत ते भाराताविरुध्द खेळले.

पाकिस्तानचे फझल मेहमूद हे पहिले जलद गोलंदाज. पण अलीकडच्या पाकिस्तानी गोलंदाजांप्रमाणे त्यांच्याकडे भीतिदायक वेग नव्हता. कॉलेजात असताना सतरा वर्षाचे त्यांनी रणजी सामन्याद्वारे मार्च १९४४ मध्ये प्रथम श्रेणी पदार्पण केले. नॉदर्न इंडियासाठी सदर्न इंडियाविरुध्द त्यांनी ११ व्या क्रमांकावर खेळताना नाबाद ३८ धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर वेस्टर्न इंडिया विरुध्द त्यांनी ६५ धावात ६ बळी मिळवले. १९४५-४६ मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची जवळपास निवड झालीच होती. कप्तान नवाब पतौडी यांना संघात फझल हवे होते पण निवडकर्त्यांना ते फारच कमी वयाचे वाटल्याने त्यांची निवड झाली नव्हती. १९४६-४७ मध्ये त्यांनी उत्तर विभाग संघाकरता आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावून आपले अष्टपैलूत्व सिध्द केले. त्याच सामन्यात त्यांनी सहा विकेटसुध्दा घेतल्या. या विभागीय स्पर्धेतील कामगिरीने त्यांना १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघातील स्थानाचे दावेदार बनवले. संघात त्यांची निवडसुध्दा झाली. प्रशिक्षण शिबिरातही ते सहभागी झाले पण स्वातंत्र्य आणि फाळणीची वेळ आली आणि फझल यांनी दौऱ्यावर जाणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यांनी पाकिस्तानला पसंती दिली.

नवनिर्मित पाकिस्तानमध्ये पहिला प्रथमश्रेणी सामना २७ डिसेंबर १९४७ रोजी पंजाब व सिंध संघादरम्यान खेळला गेला. त्यात फझल पंजाबकडून खेळले आणि त्यांनी ६ विकेट घेण्यासोबतच ६० धावासुध्दा केल्या. याच सामन्यात त्यांची गाजलेले गोलंदाज साथीदार खान मोहम्मद यांच्याशी जोडी जमली. पाकिस्तान संघाने तत्कालीन सिलोनचा दौरा केला तेंव्हा फझल हे २० बळींसह सर्वात सफल गोलंदाज ठरले. १९५२ मध्ये पाकिस्तान संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आणि ऑक्टोबर १९५२ मध्ये ते पहिली कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आले. त्यावेळी दिल्ली कसोटीत फझल मेहमूद यांनी सुध्दा पाकिस्तान संघासोबतच कसोटी पदार्पण केले. त्यावेळी पहिल्या डावात त्यांनी ९२ धावात दोन गडी बाद केले. यातील पहिले यश भारतीय कर्णधार लाला अमरनाथ यांना बाद करण्याचे होते. याप्रकारे ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली फझल मेहमूद पाच वर्षांपूर्वी भारतासाठी खेळणार होते त्याच कर्णधाराला त्यांनी पाकिस्तानसाठी बाद केले होते.
३४ कसोटी सामन्यांत त्यांनी २४ च्या सरासरीने १३९ विकेट्स घेतल्या. त्यांचा २.०९ हा इकॉनॉमी रेट तर भन्नाटच होता. फाझल महमूद यांचे ३० मार्च २००५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami