संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग! दोघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

विजयवाडा- आंध्र प्रदेशाच्या विजयवाडा येथील जिमखाना ग्राउंडवर लावण्यात आलेल्या फटाक्यांच्या स्टॉलला भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. त्यात 2 जणांचा होरपळून मृत्यू झाल्यामुळे दिवाळ सणाच्या आनंदावर विरजन पडले.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 अग्निबंबांद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केले. मात्र आगीने संपूर्ण फटाक्यांच्या स्टॉलला आगीने वेडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना तारेवरची कसरत करावी लागली. स्टॉलमधील फटाके एकामागून एक फुटत होते. परिसरात धुराचे लोण लोण सर्वत्र पसरले होते. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीने वातावरण होते. त्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी आग कशीबशी विझवली. मात्र घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami