संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

विठ्ठल मंदिरातील बुंदी लाडूप्रकरण न्यायालयात पोहचले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

सोलापूर- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बुंदी लाडू प्रसादाचा प्रकरण आता न्यायालयात पोहचले. बुंदी लाडू प्रसाद निविदा प्रक्रियेमध्ये पात्र झालेल्या 4 निविदांचा दर गेल्या 1 वर्षांपासून उघडलेला नसल्यामुळे आता हा वाद न्यायालयात पोहचला. मात्र विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर लाडू प्रसाद मिळत नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे.

कोरोनाचा जोर कमी झाल्यानंतर दीड वर्षांपूर्वी लाडू निविदा काढण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत करावी असा अर्ज सुर्वणक्रांती महिला उद्योग आणि रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड दत्तात्रय खडतरे यांनी दिली. पुरेशी स्पर्धा झालेली असताना किरकोळ कारणास्तव शासन परिपत्रके व निर्णय डावलून विनाकारण सर्व निविदा अपात्र करुन फेरनिविदा प्रक्रिया राबवली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami