पाटणा- पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान गोळीबाराची घटना घडली. सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी २ वाजेपर्यंत चालले. मतदानाच्या काही वेळापूर्वी पाटणा कॉलेजच्या गेटवर पाच ते सहा राऊंड गोळीबार झाल्याने घबराट पसरली. गोळीबारासाठी पटेल वसतिगृहात राहणाऱ्या मुलांवर आरोप करण्यात येत आहे.
पटेल वसतिगृह आणि जॅक्सन वसतिगृह यांच्यात हाणामारी आणि संघर्षादरम्यान हा सर्व प्रकार घडला. कार्यक्रम कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. एका वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराचा कॅमेरा तुटला. हा गोंधळ शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीमार केला.पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत एकूण 24,395 विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क मिळाला.