संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

विद्यार्थ्यांना दिलासा! १५ मार्चपासून शालेय पोषण आहार योजना सुरू होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिजवलेले अन्न येत्या १५ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोरोनानंतर शाळा सुरू झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोषण आहार योजना बंद असल्याने आणि शाळा सुरू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ती आता दूर होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परिणामी विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न पुरवणारी शालेय पोषण आहार योजनाही बंद झाली होती. कोरोनाची परिस्थिती आता आटोक्यात आल्यामुळे शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र पोषण आहार योजना सुरू झाली नव्हती. परंतु आता सरकारने ही योजना १५ मार्चपासून सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. पोषण आहार योजना बंद असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होत आहे. ही बाब राज्यातील विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ आणि शिक्षकांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर १५ मार्चपासून विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांना दुपारचा सकस आहार मिळणार असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami